in ,

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले त्या माणसाबद्दल बोलायला नको, निलेश राणेंचा प्रहार

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रहार केला आहे. भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी रत्नागिरीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी अजित पवारांवर त्यांनी घणाघाती टीका केलीय.

आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपवर टीका करतो आणि आपण सहन करायची का, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का? धनंजय मुंडेंनाही टोला

इतकचं नाही तर धनंजय मुंडेंचे नाव न घेता निलेश राणेंनी मुंडेंना लक्ष्य केलं आहे. प्रॉपर्टी लपवणारे बायका लपवणारे सुसंस्कृत का, असा टोला निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. फणडवीस शपथविधीच्या पहाटे काय घडलं ते अजून सांगत नाहीयेत, जर सांगितलं तर अजित पवार बारामतीतसुद्धा फिरू शकणार नाही, असं सांगत निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

आदित्य ठाकरेंवरही हल्लाबोल

तर अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून देखील निलेश राणेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंचे नाव घेतले, मग आम्ही काय बोलायचे नाही, तुम्ही खून करा, तुम्ही नाईट किंग आहात ना मग रात्री मर्डर करा, यांना काय लायन्सस आहे का?, सुशांत सिंग प्रकरणातले सीडीआर रिपोर्ट, सीसीटीव्ही कुठे गेले, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दिल्ली आंदोलकांवरून संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

दिल्लीतल्या आंदोलकांची शिवसेनेच्या खासदारांनी काल भेट घेतली. यावरूनसुद्धा निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत शेतकरी आंदोलकांना भेटायला गेले, मात्र कधी मराठा समाज्याच्या आंदोलकांना भेट दिली का? असा सवाल माजी खासदार निलेश राणेंनी उपस्थित केला. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यावर माजी खासदार निलेश राणेंनी तोंडसुख घेतलंय. सिंधुदुर्गातील प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलकांना भेटीला न जाता दिल्लीतल्या शेतकरी आंदोलकांना भेटल्यावरून निलेश राणेंनी विनायक राऊत यांनी चिमटे काढले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कर्करोगाविषयी जागृकता आणण्यासाठी ‘लोकशाही’ची मोहीम

Farmers Protest : आता लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या बाजूने ट्विट