in

Ajit Pawar Birthday:महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची एकसष्ठी; जाणून घेऊयात राजकीय कारकीर्द

Share

महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून लोकप्रिय असलेले व राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळणारे अजित अजित यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. दरम्यान आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात…

शरद पवार यांच्यानंतर अजितदादांचे नाव राष्ट्रवादीचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून अभिमानाने घेतले जाते. अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे थोरले भाऊ अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. काकांच्या पावलांवर पाऊल ठेवून अजित पवार राजकारणात आले असले तरी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा वाटाही यात तितकाच महत्वाचा राहिला आहे.उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, अर्थमंत्री, विरोधी पक्षनेता अशी विविध खाती सांभाळण्याचा 15 वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेल्या अजित पवारांची प्रशासनावरील पकड ही मजबूत आहे. सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला आहे.

राजकीय कारकीर्द

 • 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे अजित पवारांचा जन्म झाला.
 • पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचे मूळगाव आहे.
 • देवळालीमध्येच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.
 • अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्यावर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.
 • पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली. 16 वर्ष ते त्या पदावर होते.
 • 1991 साली सर्व प्रथम अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. नंतर काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
 • त्यानंतर शरद पवार पी.व्ही. नरसिम्हा राव सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले.
 • 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून गेले.
 • 1995 साली युतीचे सरकार आले. त्यानंतर 1999 साली पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले.
 • विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. ऑक्टोंबर 1991 ते डिसेंबर 2003 पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते.
 • डिसेंबर 2003 ते ऑक्टोंबर 2004 या काळात त्यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
 • 2004 साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा जलसिंचन खाते त्यांच्याकडेच होते. 2004 साली त्यांना पुण्याचे पालकमंत्री बनवण्यात आले. 2014 पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते.
 • 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित यांनी उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि, त्या काळात छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवडले गेले.पण मग राजकारणात बदल होतो. डिसेंबर 2010 मध्ये अजितची इच्छा नाट्यमयरीत्या पूर्ण झाली आणि ते उपमुख्यमंत्री झाले.
 • 2013 मध्ये त्यांचे नाव वादाशी जोडले गेले, अजितचे नाव सिंचन घोटाळ्यात पुढे आले आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. परंतु विरोधी पक्षाच्या आरोपानुसार राष्ट्रवादीकडून बऱ्याच दबावानंतर त्यांना 7 डिसेंबर 2013 रोजी क्लीन चिट मिळते आणि त्यांनी आपले पद कायम ठेवले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Maharashtra’s Lonar lake colour changes to pink

VIDEO : मोठी बातमी; लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी का झाला? झाला खुलासा

गुरुनाथ सुभेदारची दुसरी गर्लफ्रेंड दिसते इतकी हॉट!