राज्यातील कोविड सेंटरमध्ये वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता आता कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 31 मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये महिलेवर अतिप्रसंग केल्याची घटना दुदैवी आहे.सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत तथ्य आढळल्याने संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.
प्रकरण काय?
औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं गोंधळ करताच डॉक्टर त्या ठिकाणाहून फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती.
Comments
Loading…