in

Father’s Day; क्रिकेटर अजिंक्य रहाणेची बाबांसाठी खास पोस्ट

Share

जगभरात आज फादर्स डे साजरा करण्यात येत आहे. या निमित्त प्रत्येकजण आपल्या बाबांचा फोटो सोशल मीडियावर शेयर करत,त्यांना शुभेच्छा देत आहे. याचप्रमाणे मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने देखील वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील आई ही कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा एका अभाळा प्रमाणे कुटुंबाच्या डोक्यावरचं छत्र असत.वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. अशा या दिवसानिमित्त आई आणि बाबांसोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर करत अजिंक्य रहाणेने शुभेच्छा दिल्या आहेत.

अजिंक्यने, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे वडिलांचा मोठा हात असल्याचं त्याने अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. लहानपणी डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून मी योग्य रितीने जातोय की नाही हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे असं अजिंक्य म्हणाला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Sushant Singh Rajput: शुशांतचं राहतं घर झपाटलेलं, रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

‘तो’ माझं सगळ्यात पाहिलं प्रेम…