in

शिवसेना नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन; भाजपची टीका

Share

राज्यात एकीकडे हिंदूत्वाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपात वाकयुद्ध रंगले असताना, शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेचं आयोजन करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या भूमिकेवर आता भाजपकडून शिवसेनेवर टीकेचा भडीमार होतोय.

या संदर्भात पांडुरंग सकपाळ यांनी बसीरत ऑनलाइनशी बोलताना सांगितलं की, मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी अजानच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजानला विरोध करणंही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, असेही ते म्हणाले आहेत.

शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच विधान हे शिवसेनेचं सत्तेनंतरचं बदलतं स्वरूप स्पष्ट करणारं विधान आहे. यात कहर म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा दाखला त्यात देण्यात आला आहे. यांनी सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेच्या मूळ आचारविचाराला तिलांजली देणारी वाटचाल सुरु केली असल्याची टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“शिवसेनेला आता मंदिरांत घंटा बडवणारा हिंदू नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतिपाठातून, ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून आणि भजन-किर्तनातून मनःशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळत असल्याची टीका भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

…तर जयंत पाटील भाजपात असते – नारायण राणे