in

AirForceDay | वायुदलाची ‘शमशेर’, अमेरिकेने ही विमाने हिंदुस्थानला मिळू नये यासाठी लावला होता जोर

Share

भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे. येथील आयोजित कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे राफेल लढाऊ विमान हे यंदाचे खास आकर्षण आहे.

ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स आणि फ्रांसच्या एअरफोर्ससाठी SEPECAT नावाची कंपनी जग्वार फायटर विमानांची निर्मिती करत होती. मात्र नंतर हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडने हे फायटर जेट्स बनवण्याचे लायसेन्स घेतले. 1979 ला हिंदुस्थानच्या वायुदलात समाविष्ट करण्यात आलेल्या या विमानाला ‘शमशेर’ नाव देण्यात आले. 2008 मध्ये एका जग्वार विमानाची किंमत 60 कोटी रुपये होती.\

लांबच्या अंतरावर वजनदार बॉम्ब नेण्यास हे विमान सक्षम आहे. तसेच कमी उंचीवर अधिक वेगाने उडण्यास हे विमान माहीर आहे. या विमानाचा वेग 1,350 किलोमीटर प्रतितास आहे. यासह अणुबॉम्ब नेण्यासही हे विमान सक्षम असून ही विमाने हिंदुस्थानला मिळू नये यासाठी ब्रिटन आणि हिंदुस्थानमधील करार थांबवण्यासाठी अमेरिकेने जोर लावला होता.

वायुदलाच्या ताफ्यात 1979 ला या विमानांचा समावेश झाला. तेव्हापासून काळानुरूप यात अनेकदा बदल करण्यात आले. सध्या देखील वायुदल या विमानांचा वापर करत आहे. मात्र लवकरच ‘शमशेर’ म्यान होणार असून या विमानांना निवृत्त केले जाणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

रेल्वेची तिकिटे अ‍ॅमेझॉनवर मिळणार

Mumbai Local | मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश