लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जेव्हा देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाली होती, तेव्हा प्रवासाला लागणाऱ्या वेळेनुसार देशातील 7 मार्गांची विभागणी करण्यात आली होती. या प्रत्येक मार्गासाठी किमान आणि कमाल प्रवास भाडे निश्चित करण्यात आले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने याच कॅटेगरीमध्ये किमान 10 टक्के आणि कमाल 30 टक्के प्रवास भाडे वाढवले आहे. परिणामी इंधन महागल्याने देशांतर्गत विमान प्रवासही महागला आहे. केंद्र सरकारने भाड्यांवरील मर्यादा ३० टक्क्यांनी वाढविल्याने ही भाडेवाढ हाेणार आहे. याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
काेराेनामुळे प्रवासी विमान वाहतूक मे महिन्याच्या अखेरपर्यंत बंद हाेती. ती पुन्हा सुरू करताना सरकारने प्रवास भाड्यांवर ३१ मार्च २०२१ पर्यंत नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला. विमान कंपन्या पूर्ण क्षमतेने उड्डाण करेपर्यंत नवी भाडे रचना लागू राहील.
- असा हाेईल बदल
- ४० ते ६० मिनिटांच्या विमान प्रवासाचे भाडे आता २८०० ते ९८०० रुपयांपर्यंत राहणार आहे.
- तर ६० ते ९० मिनिटांच्या विमान प्रवासासाठी ३३०० ते ११७०० रुपयांपर्यंत भाडे राहील.
- मुंबई ते नवी दिल्ली प्रवासभाडे आता ३९०० ते १३००० रुपयांपर्यंत असेल.
Comments
Loading…