in

भारताच्या आक्षेपातनंतर WHO ने ‘त्या’ व्हेरियंटचे बदलले नाव

काही दिवसापूर्वी करोना व्हेरियंट B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला जागातिक पातळीवर भारतीय व्हेरियंट म्हटल्यानंतर भारताने आक्षेप घेतला होता. अखेर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय व्हेरियंट नाव बदलून त्याचे ‘डेल्टा व्हेरियंट’ (Delta Variant) असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या करोना विषाणूचे नाव संबंधित देशांशी जोडण्यावरून वाद निर्माण झाला होताा. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणूच्या प्रकारांना नावे देण्याचा निर्णय घेतला.

विषाणूच्या कोणताही करोना स्ट्रेन / व्हेरियंट कोणत्याही देशाच्या नावाने ओळखला जाऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना विषाणूच्या सर्व व्हेरियंट / स्ट्रेनचं नामकरण करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये, सर्वप्रथम भारतात आढळलेल्या करोना व्हेरियंट B.1.617 या विषाणूच्या प्रकाराला ‘डेल्टा व्हेरियंट’ (Delta Variant) असे नामकरण करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने याची सोमवारी घोषणा केली. करोनाचा हा व्हेरियंट आतापर्यंत ५३ देशांत आढळला आहे. या नव्या नामकरणामुळे करोना विषाणूच्या सध्याच्या वैज्ञानिक नावांत बदल होणार नाही. कारण ते वैज्ञानिक तथ्य आणि शोधावर आधारित आहेत, असे जाागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वैगेरे घडणार नाही – संजय राऊत

पालघरमध्ये नवजात बालकाला कोरोनाची लागण