in

अ‍ॅप्सवरील बंदीनंतर आता ‘चायनीज हँडसेट’ मोदी सरकारच्या रडारवर

Share

चिनी अ‍ॅपमधील पबजीसह 118 अ‍ॅपवर भारतात बंदी ठेवण्यात आली आहे. चिनी गुंतवणूकदारांच्या न्याय्य हक्कांवर भारताच्या निर्णयामुळे गदा आली असल्याची टीका चीनने केली आहे. मात्र, भारताने आपली भूमिका बदलली नसून चीनी अ‍ॅपनंतर आता चायना मोबाइल हॅण्डसेटवरही बंदी घालण्याचा विचार भारत सरकार करत आहे. 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत डिजिटल कम्युनिकेशन कमीशनकडून डेटाची प्रायव्हसी आणि सुरक्षेच्या सिफारशींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

भारतामधील डेटाची चोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने 118 चायना अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यामध्ये पबजी अ‍ॅपवरही बॅन करण्यात आले. या बंदी घातलेल्या मोबाईल अ‍ॅपपैकी एकट्या पबजीचे भारतात 5 कोटी वापरकर्ते होते. याआधीही भारताने चिनी बनावटीच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली होती. आता, भारताकडून चायना कंपनीच्या मोबाईल हँण्डसेटवरही बंदी घालण्यात येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. ट्रायच्या शिफारसीनुसार, हँण्डसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ट्रायने 2018 मध्ये यासंदर्भात शिफारस केली होती. ट्रायकडून डेटाच्या प्रायव्हसी, सुरक्षा संदर्भात शिफारस करण्यात आली होती.

आयसीएने ट्रायच्या शिफारसींचा विरोध केला होता, या शिफिरसीनुसार एप्स, ऑफरेटींग सिस्टीम, मोबाईल हॅण्डसेटला ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा करणे बंधनकारक असेल. कंपन्यांना आपले सर्व्हर भारतातच लावावे लागतील, असे म्हटले होते. सध्या देशातील 74 टक्के बाजारात चायना मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोटारसायकल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

IPL 2020 लाईव्ह पाहण्यासाठी JIO चा नवा ‘प्लॅन’