कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी पसरवलेल्या दहशतीमुळे आणि बेकायदेशीर मिरवणुकीमूळे त्याच्यासह 150 ते 200 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गजा सह त्याच्या 9 लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता शरद मोहोळ या गुंडाविरेधातही गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळ याची कातील सिद्दिकीच्या खूनातून मुक्तता झाली होती. त्यावेळी त्याच्या समर्थकांनीही गजा समर्थकांसारखे दहशतीचे वातावरण निर्माण केलं होतं.
26 जानेवारीला एका कार्यक्रमात शरद उपस्थित राहिला असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments
Loading…