in ,

अखेर स्थलांतरीत नागरिकांना घरी जाण्याची मुभा, ‘या’ आहेत सूचना…

Share

नवी दिल्ली: लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यांमध्ये जाता यावे यासाठी सूचना जारी केल्या आहेत. पाहूया, काय आहेत या सूचना…

१. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल प्राधिकरणाची स्थापना करतील. या प्राधिकरणाचे अधिकारी आपापल्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यादरम्यान लोक स्थलांतर करणार आहेत, तेथील अधिकारी एकमेकांशी संपर्क साधतील आणि लोक हा प्रवास कसा करतील याबाबत निश्चित धोरण आखतील.

२. ज्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांची स्क्रीनिंग केली जाईल. त्यांच्यात कोविड -१९ ची कोणतीही लक्षणे न दिसल्यास त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल.

३. अडकलेल्या लोकांच्या प्रवासासाठी बसेस वापरल्या जाऊ शकतात. बसेसचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार लोकांना बसमध्ये बसवले जाईल.

४. कोणतेही राज्य या बसेसना त्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखणार नाही आणि त्यास जाऊ देण्यात येईल.

५. गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लोकांची तपासणी केली जाईल. बाहेरून आलेल्या लोकांना फिरण्याची परवानगी असणार नाही. त्यांना थेट होम क्वारंटीन व्हावे लागेल. गरज भासल्यास त्यांना रूग्णालयात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये देखील दाखल केले जाऊ शकते. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाईल.

६. अशा लोकांना आरोग्य सेतू हे अॅप वापरावे लागेल. याद्वारे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जागतिक नृत्य दिवस; ‘असा’ डान्सर होणे नाही

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दहा हजाराच्या अलीकडे, आज ३२ जणांचा मृत्यू