in

Afghanistan| पंजशीरमध्ये लढाई सुरूच

तब्बल २० वर्षानंतर तालिबानी संघटन्यानी अफगाणिस्तवर कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील पंजशीरवरील कब्जावरून तालिबान आणि तालिबान्यांना विरोध करणाऱ्या फोर्सेसमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच आहे. शनिवारीदेखील येथे रक्तरंजित लढाई झाली. यात अनेक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. पंजशीरच्या इशान्येकडील प्रांतात सुमारे 600 तालिबानी मारले गेले असून 1,000 हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांनी गुडघे टेकल्याचा दावा विरोध करणाऱ्या गटाने दिला आहे.

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, “पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत.” तालिबान विरोधी गटाने 600 तालिबान्यांना मारल्याचा दावा केला आहे. तर आम्ही पंजशीरच्या चार जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता बिलाल करीमी म्हणाला, “आम्ही पंजशीर प्रांतातील सात पैकी चार जिल्हे ताब्यात घेतले आहेत. आता आम्ही पंजशीरच्या दिशेने जात आहोत.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता पुण्यात होणार ‘जिराफ’ दर्शन

केरळमध्ये करोनानंतर निपाह व्हायरसचा धोका