in

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या चौकशीला सुरुवात

Share

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर सुरु झालेल्या ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीतचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज रकुल प्रीत एनसीबी कार्यालयात दाखल झाली असून तिच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.

एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज रकुलची चौकशी होणार असल्याने ती आता एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

तिच्यासह अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील चौकशी होणार आहे.त्यामुळे तिच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. तसंच शनिवारी २६ सप्टेंबरला दीपिका पदुकोणची खील चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

शहीद जवान नरेश बडोले यांचे पार्थिव नागपूरात

कोरोनाबाधितांचा आकडा 58 लाखांच्या पार