in

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

Share

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर आता ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी निवेदिता सराफ यांना कोरोना विषाणूचे सौम्य लक्षणं असल्याचं जाणवू लागलं होतं. अखेर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत.

दरम्यान कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहाता लॉकडाऊन अंतर्गत सरकारने शुटिंगसाठी बंदी घातली होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेच्या माध्यमातून सेटवर योग्य ती खबरदारी बाळगून मालिका, चित्रपटांची शुटिंग सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Maratha Reservation : मराठा गोलमेज परिषदेत मोठी घोषणा ; 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद

NCB ने पाठवले दीपिका,श्रद्धा आणि साराला समन्स