भारतामध्ये कोरोनाची लस जरी मिळाली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे नष्ट झाला नाही. आता पर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळाले आहे. आता अभिनेता रणवीर शौरी कोरोनाची लागण झाली आहे. रणवीरने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
“मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. माझ्यात सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी क्वारंटाइन झालो आहे”, अशी पोस्ट रणवीरने शेअर केली आहे.
रणवीर शौरी त्याच्या चित्रपटातून तो नेहमीच वेगवेगळे विषय हाताळत असतो. अलिकडेच तो ‘लूटकेस’आणि ‘अंग्रेजी मीडियम’या चित्रपटात झळकला होता.
Comments
Loading…