in

गूगल डूडल वर ‘ का ‘ रंगले अभिनेते शिवाजी गणेशन

दिवंगत अभिनेता शिवाजी गणेशन यांची आज 93 वी जयंती आहे. त्यांच्या जयंती निमित्त सर्च इंजिन गूगलने डूडल साकारले आहे.बंगळुरु येथील कलाकार नूपुर राजेश चोकसी यांनी हे डुडल बनवले आहे.

अभिनेता गणेशन यांचा जन्म ब्रीटीशकालीन भारतातील मद्रास प्रेसीडेंन्सी प्रांतातील विल्लुपूरम येथे 1 ऑक्टोबर 1928 ला झाला. वय वर्षे सात असताना ते एका थिएटर ग्रुपमध्येही सहभागी झाले. त्यासाठी त्यांनी आपले घर सोडले. गणेशमुर्ती यांनी डिसेंबर 1945 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “शिवाजी कांडा हिंदू राज्यम” या नाटकात काम केले. त्यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका केली. ती भूमिका लोकांना इतकी आवडली की तेव्हापासून लोक त्यांना शिवाजी नावानेच ओळखू लागले.

शिवाजी गणेशन हे प्रामुख्याने तामिळ सिनेमामध्ये अधिक कार्यरत होते. 1952 मध्ये त्यांनी “पराशक्ति” चित्रपटापासून चित्रपटातील अभिनयाची कारकीर्द सुरु केली. पुढे त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी तेलुगु, कन्नड़, मलयालम और हिंदी भाषेतही चित्रपट केले. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. यात स्थानिक ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांना काहिरा, इजिप्तमधील एफ्रो-एशियन फिल्म फेस्टिवल सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळवणारे ते पहिले अभिनेते होते.

त्यांनी जवळपास 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तामिळ भाषेतील चित्रपटांतून अभिनय आणि आवाजाचे जादूगार म्हणून पुढे आलेले गणेशन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी ओळख निर्माण केली. गणेशण यांनी राजकारणातही काम केले. त्यांना लॉस एंजिल्स टाइम्स ने चित्रपट उद्योगातील मार्लन ब्रँडो अशी उपाधी दिली. 21 जुलै 2001 मध्ये त्यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेल्वे स्थानकावर पोलिसांना सापडलेला अनाथ नारायण इंगळे बनला अधिकारी

‘मान्सून’ उशिरा करणार परतीचा प्रवास