in

अभिनेते सयाजी शिंदे यांचं अनोखं आवाहन; वारीनिमित्त झाडाला द्या आलिंगन

Share

अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयासोबतच ते राबवत असलेल्या अनेक स्तुत्य उपक्रमासाठी फारच प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक अनोखं आवाहन एका व्हिडिओद्वारे केलं आहे. सयाजी शिंदे यांनी एक व्हिडीओ नुकताच रिलीज केला आहे ज्यामध्ये ते महाराष्ट्रातील ग्रामसेवकांना एक विशेष आवाहन करताना दिसले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड गाजतो आहे. सयाजी शिंदे या व्हिडिओमध्ये वारी यंदा होणार नाही याबद्दल बोलताना दिसले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दरवर्षी लाखो वारकऱ्यांना एकत्र आणणारी वारी यंदा मात्र रद्द करण्यात आली आहे. यानिमित्त सयाजी शिंदे यांनी ग्रामसेवकांना वारी यंदा होणार नसली तरीही आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील सगळ्यात जुन्या झाडाला आलिंगन देण्यास सांगितल आहे. झाड हे आपल्यासाठी म्हणजेच माणसांसाठी खूप मोलाचा आहे आणि म्हणून या झाडांचं महत्त्व ओळखून त्यांना मिठी मारावी असं आवाहन त्यांनी ग्रामसेवकांना केलं आहे. 

सयाजी यांनी या व्हिडिओ सोबत एक नंबर सुद्धा शेअर केला आहे ज्यावर त्यांनी झाडांना मिठी मारतानाचे  सेल्फी पाठवण्यास सांगितल आहे. त्याच्यासोबत ते असं सुद्धा म्हणताना दिसले आहेत की या सगळ्या सेल्फी मधून दहा सगळ्यात जुनी झाडं असलेले सेल्फी निवडले जातील आणि त्या झाडांना सेलिब्रिटी स्टेटस दिला जाईल. सयाजी शिंदे यांचा हा अनोखा आणि नवीन स्तुत्य उपक्रम पुन्हा एकदा हिट ठरणार हे काय वेगळे सांगायला नको. या सगळ्याला आता कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागलेले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

१२ जुलै रोजी सुरू होणार नाट्यगृह, रंगणार ‘शुभारंभाचा प्रयोग’?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात; दोघे जागीच ठार