in

आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत झाला अपघात; २ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी

कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. यात अपघातात २ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० वारकरी जखमी झालेत.

खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने पायी जात होते. तेव्हा, जवळवून जाणाऱ्या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली. यात, २५ वारकरी जखमी झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या नव्या विषाणूसमोर सध्याची रोगप्रतिकारक शक्तीही निष्प्रभ?

Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर