in

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (एमएच 19 वाय 7123) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेनं जात असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 21 बीएफ 7178) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात स्विफ्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्यानं स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं. जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा इथं हलवण्यात आलं आहे. सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price Hike: का वाढतायत पेट्रोल-डिझेलचे दर?

कोल्हापुरातील बंद झालेली कोरोना सेंटर्स पुन्हा सुरु करणार