in

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडा क्षेत्रात स्वतःचे अढळस्थान निर्माण करणारी कबड्डीपंच – आरती बारी

तिचा जन्मच जणू काहीतरी वेगळं करण्यासाठी झाला आहे. इतर मुलींसारखी घरातील कामे करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करायला हवं, हा विचार तिच्या मनामध्ये नेहमी असायचा. ज्या मातीमध्ये आपण वाढलो, त्या मातीसोबत कायम नाळ जोडून राहायला हवी, ही तिची मनोमन असणारी इच्छा. मनामधील ही मनिषा पूर्ण करण्यासाठी तिने कबड्डीच्या मैदानालाच आपली कर्मभूमी मानली. सुरुवातीला कबड्डीपटू असलेली ती पुढे कबड्डीतील महत्वाचा दुवा झाली. म्हणजेच कबड्डी कोच म्हणून काम करू लागली. प्रो कबड्डी या स्पर्धेमध्ये तीन वेळा तिने कोच म्हणून जबाबदारी पार पाडली.

पुढे कबड्डीच्या बोनस लाइनला हात लावल्यासारखी तिची झेप सातासमुद्रापार गेली. इराण येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला ठरली. ले पंगा म्हणत सुरु केलेल्या प्रवासामध्ये तिने मागे वळून कधी पहिलेच नाही. एक आई, एक कबड्डीपटू, एक उत्तम कोच खेळाच्या दुनियेत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी आरती बारी… पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडाक्षेत्रात स्वतःचे आढळस्थान निर्माण करणाऱ्या कबड्डीपंचाला महिला दिनी मानाचा मुजरा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिला दिन : तीन लाखांहून अधिक अर्भकांना सुरक्षित जग मिळवून देणारी – डॉ मिनी बोधनवाला

आज जागतिक महिला दिन; ‘लोकशाही न्यूज’कडून शुभेच्छा