in

आरोग्य सेतू, झोमॅटो, ओला आमच्यापेक्षा जास्त डेटा गोळा करतात; WhatsAppचा हायकोर्टात दावा

नवीन गोपनीयता धोरणांवरून वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. आपल्या प्रतिज्ञापत्रात व्हॉट्सअ‍ॅपने आरोप केला होता की, बहुतेक वेबसाइट्स आणि अ‍ॅपचे धोरणे सारखीच असतात. ते व्हॉट्सअ‍ॅपच्या तुलनेत आणखी डेटा संकलित करतात. यामध्ये फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंग अ‍ॅपने झोमॅटो, बिगबास्केट, ओला, कू, ट्रू कॉलर, आरोग्य सेतू या कंपन्यांची नावे दिली. व्हॉट्सअ‍ॅपने या सर्वांवर अधिक वापरकर्त्यांचा डेटा जमा करण्याचा आरोप लावला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने ५ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. ज्यामध्ये अन्य अ‍ॅप्सद्वारे वापरकर्त्याचा डेटा घेण्यात येत असल्याची टीका केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने प्रतिज्ञापत्रात गुगल, मायक्रोसॉफ्ट, झूम आणि रिपब्लिक वर्ल्डचे नावही दिले आहे, जो रिपब्लिक टीव्हीचा डिजिटल उपक्रम आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन; अशी आहे नियमावली

‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब’