लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच चित्रपटातील कौशल्याची भूमिका कोण बजावणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ‘आदिपुरुष’मध्ये कौशल्याच्या भूमिकेसाठी बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचं नाव समोर येत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी हेमा मालिनींसोबत या भूमिकेविषयी चर्चा केली आहे. हेमा मालिनी इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास उत्सुक आहे पण अद्याप काही फायनल झालेले नाही. हेमा मालिनी यांचं चाहते त्यांना कौशल्याच्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार ‘आदिपुरुष’चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे.
भूमिकेसाठी खास तयारी
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे.
Comments
Loading…