in ,

यवतमाळच्या आर्णी जवळ भीषण अपघात; ३ प्रवासी जागीच ठार, २२ जखमी

Share

यवतमाळ: मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १५ मजूर गंभीर जखमी आहे. आर्णी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या डंपरला एसटी बस धडकली. त्यामुळे एसटीचा पुढील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

दरम्यान कोळवण गावाजवळ ही घटना घडली. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मिरा भाईंदरातमध्ये कोरोनाचा कहर! २४ तासात नवे २१ रुग्ण; एक मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ३५१ वर

औरंगाबादमध्ये २४ तासात ५१ कोरोना रुग्णांची वाढ; कोरोनाबाधीतांचा आकडा १ हजार ७३ वर