in ,

कोरोनाच्या लढ्यात केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसचं पथक मुंबईत दाखल

Share

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. देशातील सर्वच राज्ये कोरोना महामारीचा सामना करत आहेत. देशातील सर्व राज्य आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. परंतु इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची स्थिती पाहता कोरोनाबाधितांचा आकडा रोजच वाढतो आहे. त्यामुळेच राज्य सरकारं एक मोठा निर्णय घेतला होता. राज्य सरकारनं केरळ सरकारला एक पत्र पाठवलं होतं. (Maharashtra Coronavirus News)

कोरोनाच्या लढ्यात महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना आता केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होणार आहे. सरकारच्या विनंती नंतर केरळने टीव्हीएम मेडिकल कॉलेजचे अधीक्षक संतोष कुमार यांच्या नेत्वृखाली 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 100 जणांची पहिली टीम मुंबईत पोहचली आहे. हे पथक सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असल्याची माहिती केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी दिलीय.

सध्या मनुष्यबळ अपुरे असल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांना पत्र लिहीत 50 डॉक्टर आणि 100 नर्सेसची मागणी 23 मे रोजी केली होती. तसेच महाराष्ट्राची परिस्थिती पाहता अधिक अनुभवी डॉक्टर आणि नर्सची गरज असल्याचे देखील नमूद केले होते. त्यानुसार केरळमधील डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स, साऊथ आशिया या संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यानुसार आतापर्यंत 100 जणांची एक टीम मुंबईत सेवा देण्यासाठी दाखल झाली आहे.

देशात सगळ्यात पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने शर्थिचे प्रयत्न करत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्या पॅटर्नची चर्चा सर्व देशात झाली होती. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनीही केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करत त्यांनी कलेले प्रयत्न जाणून घेतले होते. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मदतीसाठी डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत करण्याची विनंती केरळ सरकारला करण्यात आली होती. त्या विनंतीनंतर केरळ सरकारने हे पथक पाठवलं आहे.

दरम्यान, राज्यात काल 1248 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 29 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात मागील चोवीस तासात 2487 नवे कोरोनाबाधित सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार 655 वर गेली आहे. तर राज्यात आज 89 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2286 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 36 हजार 31 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोना महासंकटात राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर महागले

आता लाड़के आदेश भावोजी घरच्या घरी वहिनींना भेटणार, झी मराठीवर लवकरच ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’