in

चिखलदऱ्यात पसरली धुक्याची चादर; 3 दिवसांपासून विदर्भाच्या काश्मीरात पाऊस

विदर्भात अद्यापही मान्सून चक्रीय व्हायचा असला तरी मान्सूनपूर्व पाऊस मात्र अनेक भागात पडत आहे .विदर्भाचं काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात मात्र मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदऱ्यात काल रात्री आणि आज पहाटे सुद्धा धुक्याची चादर पसरल्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले आहे.

मान्सूनपूर्व पाऊस हा अनेक दिवसांपासून चिखलदऱ्यात पडत असल्यामुळे आता चिखलदऱ्या वर हिरवळ पसरला देखील सुरुवात झाली आहे. विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदारा यामध्ये दरवर्षी हजारो पर्यटक हे पर्यटनासाठी येत असतात परंतु कोरोनाणाच्या पार्श्‍वभूमीवर चिखलदऱ्यातील पर्यटन मात्र बंद आहे. दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस आल्याने आता मेळघाटातील शेतकऱ्यांची देखील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.इतर तालुक्याच्या तुलनेत दरवर्षी चिखलदारा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते.

काल रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर विजांच्या कडकडाटासह चिखलदारा मध्ये पाऊस झाला त्यामुळे चिखलदरा मध्ये सुद्धा कमालीचा गारवा निर्माण झाला आहे .दरम्यान पावसाळा लागणार असल्याने प्रशासनाने पर्यटन सुरू करावे अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून फडणवीसांच्या पुतण्याला मिळाली लस; RTI मधून माहिती उघड

भाजपा नेत्याच्या मुलीची निर्घृण हत्या