करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून करीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. नुकताच करीना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर 21 फेब्रुवारी म्हणजे आज तिने मुलाला जन्म दिला आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात सैफ अली खान ने त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी जाहीर केली होते.
ही सैफिनाची जोडी दुसऱ्यांदा आई – बाबा होण्याचा आनंद घेत आहेत. या सेलिब्रिटी जोडीच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियापासून बॉलिवूडच्या कलाकारांपर्यंत सर्वजण सैफिनावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंड होत असून बाळाचं नाव, नावामागचं कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे. गरोदरपणाच्या काळात स्टाईल स्टेटमेंटमुळं करीना चर्चेत होती.
Comments
Loading…