in

आसनगावच्या प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग

आसनगाव येथे सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास प्लॅस्टिक कंपनीला आग लागली. यामध्ये दोन युनीट जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या युनिटलाही आगीने वेढले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

कल्याण भिवंडी पालिका आणि जिंदाल ग्रुपचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, प्लॅस्टिक असल्याने दोन युनिटना त्याची मोठी झळ बसली. आग विझत आलेली असताना तिसऱ्या युनिटने पुन्हा पेट घेतला. प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आग विझत आलेली असताना तिसऱ्या युनिटने पुन्हा पेट घेतला. प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे.

घटनास्थळी कल्याण अग्निशमन केंद्राचे १-फा. वा. व डोंबिवली अ. केंद्राचे १-फा. वा. उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनास्थळी मदतीची आवश्यकता असल्याने सदर घटनास्थळी सकाळी ०९:५२ वा. सुमारास ठाणे अ. दलातील बाळकूम अ. केंद्राचा १ जम्बो वॉटर टँकर रवाना झाला आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

JEE Main Result 2021: मुंबईचा सिद्धांत जेईईत अव्वल