in

पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

Share

बँकेत नोकरी करण्यास इच्छूक असणारे पदवीधर उमेदावा संधीचा फायदा घेऊ शकतात. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती करणार आहे.

यासाठी नॉटिफिकेशन जारी करण्यात आले असून, एकूण 2556 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 371 पदांचा समावेश आहे.

अर्ज शुल्क – जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर एससी/एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी 175 रुपये आहे.

शिक्षण व वयाची अट – इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 20 आणि कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गांना वयात सूट मिळेल.

निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड पुर्व व मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल. दोन्ही परीक्षा ऑनलाईन होतील. अधिक माहितीसाठी व नॉटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ या लिंकला भेट द्यावी.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Mhada : मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार