in

भारत-पाकिस्तान सीमेवर आढळला १५० मीटर लांब भुयारी मार्ग

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत-पाकिस्तान सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांना एक १५० मीटर लांबीचा भुयारी मार्ग आढळा. या भुयारी मार्गामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी केले जात असलेले प्रयत्नाची माहिती जगासमोर उघड झाली आहे.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक भुयारी मार्ग आढळा. हा भुयारी मार्ग जवळपास १५० मीटर लांब असून, यामधून काही सिमेंटची पोती देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे सिमेंट पाकिस्तानमधील कराची येथील असल्याची माहिती मिळत आहे. हा भुयारी मार्ग पाकिस्तानच्या पोस्टच्या अगदी समोरूनच खोदला गेला आहे, असे ते म्हणाले.

यापूर्वीही २०१२मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना ४०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग सापडला होता. हा भुयारी मार्ग सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये २०१४ मध्ये आढळला होता. त्याचबरोबर २०१६ मध्ये पाकिस्तानातून येणारा भुयारी मार्ग आरएस पूरा सेक्टरमध्येही सापडला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पोल्ट्री व्यवसायावर बर्ड फ्लूचं महासंकट

३१ जानेवारीपर्यंत देशातील सर्व अंगणवाडी सेवा सुरू होणार