in ,

२४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण , ५१३ जणांचा मृत्यू

देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ६० हजार ४८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ६ लाख ९१ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ६२३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘…आनंद महिंद्रा मोदींच्या लॉकडाउनमध्ये टाळ्या, थाळ्या वाजवत होते’

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात लढा देणारे 21 जवान बेपत्ता, 30 जण जखमी