मुंबईत आज 8 हजार 938 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारच्या तुलनेत आज नवीन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तर आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 86 हजार 279 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 938 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 4 लाख 91 हजार 698 वर पोहोचली आहे. 4 हजार 503 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण 3 लाख 92 हजार 514 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांपर्यत पोहोचला आहे. तसेच आज 23 रुग्णांचा मृत्यु झाला असून एकूण 11 हजार 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Comments
Loading…