in ,

उद्या पंतप्रधानांसह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देशातील ‘ही’ ९ राज्ये बोलण्याची शक्यता

Share

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग उद्या पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पूर्व आणि ईशान्य भारतातील नऊ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे. १४ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चौथ्यांदा राज्यांशी संवाद साधत आहेत.

सकाळी १० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या विस्ताराचा आढावा, योजना आणि ती टप्प्याटप्प्याने कशी राबवली जावी यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. २० एप्रिल नंतर ठराविक क्षेत्रांना देण्यात आलेला शिथिलतेवर, कोरोना चाचणी उपकरणांवर व डॉक्टरांच्या संरक्षणा संदर्भातील परिस्थितीवर ही मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

राज्यांनीही केंद्राकडून आर्थिक पॅकेज आणि FRBM (वित्तीय जबाबदारी व अंदाजपत्रक व्यवस्थापन) कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आर्थिक तुटीवर ही यादी तयार होण्याची शक्यता आहे. जागतिक महामारीसाठी दिलासा आणि प्रेरणा मिळावी म्हणून अधिक पैशांची आवश्यकता लागणार आहे. या आधीच्या बैठकीत जवळपास सर्वच मोठ्या राज्यांनी आपले विचार मांडले आहेत.

यावेळी बिहार, ओडिशा, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पॉण्डेचेरी या केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांची वेळ आहे. तसेच ईशान्येकडून मेघालय आणि मिझोरमचे मुख्यमंत्री बोलतील अशी शक्यता आहे.

देशातील मोठी किंवा छोटी सर्व राज्यांना बोलण्याची संधी देण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. २० मार्च रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत आठ राज्यांनी कोरोना विषाणूची लागण होण्यावर, वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवण्यासंदर्भात तसेच स्थानिक आरोग्य कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत आपले विचार मांडले होते.

पंतप्रधान समवेत २ एप्रिल रोजी झालेल्या दुसर्‍या बैठकीत जवळपास आठ राज्यांनी लॉकडाऊन संपल्या नंतरचे वेळापत्रक काय असेल यावर चर्चा केली. तर ११ एप्रिल रोजी झालेल्या तिसर्‍या बैठकीत १३ मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्यास सांगितले होते. बिहार व ओडिशा राज्यांचा देखील समावेश होता जिथे कोरोना संसर्ग पसरण्याचा दर कमी आहे. मेघालय राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ११ रुग्ण आहेत, तर मिझोरममध्ये एक रुग्ण आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

यवतमाळमध्ये कोरोनाने अर्धशतक पार; आज १६ नवे रुग्ण आढळले

देशभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढला, देशात कोरोनाचे २७,८९२ रुग्ण