in ,

चिंता वाढली! भारतात मागील 24 तासात 8392 नवे कोरोना रुग्ण, 230 मृत्यू

Share

नवी दिल्ली: देशात मागील 24 तासात 8392 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख 90 हजार 535 वर पोहचली असून, मृतांची संख्या 5394 एवढी आहे. सध्या देशात 93 हजार 322 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 91 हजार 819 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 67 हजार 655 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 22 हजार 333, गुजरातमध्ये 16 हजार 779 मध्यप्रदेश 8089, आंध्र प्रदेश 3679, बिहार 3815, राजस्थान 8831 तर पश्चिम बंगालमध्ये 5501 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे भारताने कोरोनाच्या एकूण रूग्ण संख्येत फ्रान्सला मागे टाकलंय. फ्रान्समध्ये कोरोनाचे 1 लाख 88 हजार 882 रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचलाय.

पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत एकूण 18 लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये पाच लाख तर रशियात चार लाख रुग्ण आहेत. देशात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं एकंदरीत चित्रंय. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन शिथील करत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढलीय. जगात पहिल्या क्रमांकावर ब्राझिल असून त्यानंतर अनुक्रमे रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतोय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Wajid Khan Passes Away : बॉलिवूडला धक्का; प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

कोरोना महासंकटात राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर महागले