in

आग्रा येथे भीषण अपघात, ट्रक – स्कॉर्पिओच्या धडकेत 8 जण जागीच ठार

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे झालेल्या एका अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या 8 जणांना जीव गमवावा लागला तर 4 जण जखमी झाले आहेत. ट्रक आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक झाल्यामुळे ही घटना घडली आहे. ठाणे एटमादुद्दोलाच्या मंडी समितीजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती बिहारच्या गयामधील आहेत. तर या गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक झारखंडमधील असल्याचंही समोर आलं आहे. स्कॉर्पिओमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्कॉर्पिओ ट्रकमध्ये घुसल्याचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील समोर आले आहेत. दरम्यान ज्या 4 व्यक्ती जखमी आहेत त्यांची परिस्थिती देखील गंभीर आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताबाबत तपास सुरू आहे. दरम्यान आठही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत तर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol-Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Mamta banerjee | ममतांवर कोणीच हल्ला केला नाही!