in

बुलेट ट्रेनसाठी ७,८९७ कोटींची तरतूद

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प होणार असून त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सात हजार ८९७ कोटी रुपयांच्या तरतूद करण्यात आली आहे. मात्र ‘एमयूटीपी’ प्रकल्पांसाठी किरकोळ तरतूद करण्यात आल्याने प्रवासी संघटनांकडून टीका होऊ लागली आहे. बुलेट ट्रेनच्या स्थानकासाठी जागा देण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०२० मध्ये ठाणे महानगरपालिके च्या महासभेत थांबवण्यात आला होता.

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने वांद्रे-कु र्ला संकुलात भूमिगत स्थानक उभारणीसाठी निविदा प्रक्रियाही सुरु केली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ११ व दादरा-नगर-हवेली येथे एक पूल व गुजरातमध्ये स्टीलचे १६ पूल बांधण्यात येणार आहे.एमयूटीपी प्रकल्पांसाठी मात्र यंदा केवळ ६५० कोटी रुपये दिले आहेत. तेवढीच रक्कम राज्य सरकारकडून मिळणार आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे प्रवासी संघटनांकडून टीका होत आहे.

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात सात हजार ८९७ कोटी रुपयांची तरतूद के ली असून, गेल्या वर्षी अर्थसंकल्पात पाच हजार कोटी रुपये मिळाले होते. पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका, ऐरोली ते कळवा उन्नत मार्गिका यासह अन्य काही प्रकल्पांसाठी ६५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर नवी यंत्रणाचुकीच्या सिग्नमुळे दोन रेल्वेगाडय़ांमध्ये टक्कर होऊन अपघात होऊ नये यासाठी मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ‘रेल्वेगाडी संरक्षण यंत्रणा’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया काढली जाईल व त्यानंतर तीन वर्षांत काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उपेंद्र लिमये आता गायक, संगीतकाराच्या भूमिकेत

जनतेच्या खिशात काही टाकत नाहीत, आहे ते तरी कशाला ओरबडता…? शिवसेनेच्या सामनातून केंद्र सरकारला सवाल