in ,

राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६४२७, आज ७७८ नवीन रुग्णांची भर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Share

मुंबई: आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आहेत. तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित १२ मृत्यूंपैकी ७ रुग्णांमध्ये ५८ टक्के  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘युद्धकोरोनाविरुद्ध’ मध्ये अभिनेत्री ‘अभिज्ञा भावे’ फक्त लोकशाही न्यूज चॅनल वर…