लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसते. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्यानंतर आता हळूहळू सुरु करण्यात येत आहेत. असं असताना आता पुन्हा कोरोनाचे आकडे राज्यात वाढताना दिसत आहेत. यातच आता वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बुधवारी 30 आणि गुरुवारी 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. शाळेतील एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. सर्व शाळांची सफाई व निर्जंतुकीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्याही जवळपास पूर्ण करण्यात आल्या असून शाळेत विद्यार्थी येण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली आहे.
राज्यात आता परत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी देखील तीन हजारांच्यावर कोरोनाबाधित झाले होते. त्याआधी हा आकडा तीन हजारांच्या खाली होता. आतापर्यंत एकूण 1,97,00,532 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत
Comments
Loading…