in ,

राज्यात आज ७४९ रुग्ण कोरोनामुक्त, २०३३ नवे रुग्ण; बाधितांची संख्या ३५ हजारांवर

Share

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

राज्यात ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १२४९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये २३, नवी मुंबईमध्ये ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद शहरात २, अहमदनगर जिल्ह्यात २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १  मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३५ पुरुष तर १६ महिला आहेत.आज झालेल्या ५१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आतापर्यंतचे सर्वाधिक ७४९ रुग्ण आज घरी सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई महानगरपालिका- २३२, ठाणे- ५९, पालघर- ३, नाशिक- १३४, धुळे -१४, जळगाव-२, नंदूरबार- ४, पुणे-१६५, सोलापूर-२३, सातारा-६, सांगली व रत्नागिरी प्रत्येकी १, औरंगाबाद- २७, हिंगोली-५, लातूर- १, नांदेड- ५, अकोला-४०, यवतमाळ- १, नागपूर- २६ रुग्ण सोडण्यात आले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ८२ हजार १९४ नमुन्यांपैकी २ लाख ४७ हजार १०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३५ हजार ५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ६६ हजार २४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १८ हजार ६७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

अप्सरा सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला! वाढदिवसाच्या दिवशी शेयर केली गुड न्यूज…

नागपूरचं कॉटन मार्केट अटी आणि शर्थींवर आजपासून सुरु