in

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 594 डॉक्टरांचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.

करोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने सांगितलं आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. रामदेव बाबा यांनी देशातील लोकांमध्ये कोरोनासंबंधी प्रोटोकॉल आणि लसींसंबंधी गोंधळ निर्माण केला असल्याचं सांगत आयएमएने ही देशविरोधी भूमिका असल्याचा उल्लेख केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू