in

24 तासांत आढळले 56,282 नवे कोरोनाबाधित, 13 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Share

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 19,64,537 पर्यंत पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात 56,282 नवे रूग्ण, 904 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारतामध्ये 5,95,501 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांचा आकडा 13,28,337 इतका आहे. आतापर्यंत देशामध्ये कोरोना व्हायरसने 40,699 जणांचा बळी घेतला आहे. दिवसागणिक जशी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांच्या वर आहे तशीच कोरोनामधून ठीक होऊन घरी परतणार्‍यांचा आकडा देखील मोठा आहे.

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये आत्तापर्यंत कोविड 19 साठी 2,21,49,351 सॅम्पल्स तपासण्यात आले आहेत. तर काल 6,64,949 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वाधिक रूग्ण आहेत. काल रात्री देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4,68,265 पर्यंत पोहचला आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट 65.25 पर्यंत पोहचला आहे.भारतामध्ये महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली मध्ये रूग्णसंख्या 1 लाखाच्या पार गेली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Covid19 रुग्णालयात लागली भीषण आग

अस्थमा रोखण्यासाठी अशी घ्यावी काळजी