in

५६ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन अडकले लग्नबंधनात

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जॉनसन यांनी कैरी साइमंड्ससोबत खासगीपद्धतीने लग्न केल्याचे माहिती मिळाली आहे. या लग्नात दोघांचे अतिशय जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार होता. हे दोघे पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा होती.

मीडिया रिपोर्टनुसार, जॉनसन आणि साइमंड्स यांनी अतिशय खासगी पद्धतीने हा सोहळा पार पाडला आहे. ३० जुलै २०२२ रोजी हे लग्न होणार असल्याची चर्चा रंगली होती. याकरता ५६ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि त्यांची ३३ वर्षीय गर्लफ्रेंड कैरी साइमंड्स नातेवाईकांना आमंत्रण देत होते. मात्र यावर लग्नाचे स्थळ देण्यात आले नव्हते. दरम्यान साइमंड्स जॉनसन यांची तिसरी पत्नी आहे.

यापुर्वी २०१९ मध्ये जॉनसन पंतप्रधान झाल्यानंतर जॉनसन आणि साइमंडस डाऊनिंग स्ट्रीटमध्ये एकत्र होते. गेल्यावर्षी त्यांना एक मुलगा झाला आहे. मुलाचे नाव विल्फ्रेंड लॉरी निकोलस जॉनसन असं आहे. या अगोदर जॉनसन यांचं लग्न मरीना व्हीलरसोबत झाले होते. या दोघांना चार मुले आहे. २५ वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर २०१८ साली हे दोघं वेगळे झाले. व्हीलरच्या अगोदर जॉनसन यांनी एलेग्रा मोस्टिन-ओवेनसोबत लग्न केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘7 वर्षात ना केला विकास, मोदींनी केला देश भकास’ काँग्रेसकडून बॅनरबाजी करत भाजपवर हल्लाबोल

Weather Alert | उद्या ‘मान्सून’ भारतीय किनाऱ्यावर धडकणार!