राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आज तब्बल 56 ह्जार 286 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यसरकाने निर्बध व लॉकडाऊन लावला असल तरी किंचित रुग्णसंख्येत घट झाली आहे. (मुंबईत आज 9 हजार नवे कोरोनाबाधित)
राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात तब्बल 56 हजार 286 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर आज 376 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यामुळे एकूण आजपर्यंत 57 हजार 28 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.77 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आज 36 हजार 130 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 26 लाख 49 हजार 757 को रोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 82.05 टक्के एवढे झाले आहे.
Comments
Loading…