in

मुंबईत 5504 नवे रुग्ण, पालिका म्हणते घाबरण्याचे कारण नाही

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी वर्षभरातील सर्वाधिक 5 हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज मुंबईत 5504 रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत 24 मार्चला 5185 रुग्ण आढळून आले होते. आज त्यात वाढ होऊन 5504 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 80 हजार 115 वर पोहचला आहे. आज मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 620 वर पोहचला आहे. 2281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 33 हजार 693 वर पोहचली आहे. अशा परिस्थितीत मात्र “मुंबईकरांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करायला हवं”, असं आवाहन इक्बाल चहल यांनी केलं आहे.

हे वाचा : राज्यात कोरोना रुग्णाचा विस्फोट; पण रुग्णालयात रुग्णांना जागाच नाही

मुंबईत सध्या 33 हजार 961 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 75 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 40 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 475 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

What do you think?

249 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona update : विषाणूचा एक नवा प्रकार भारतात!

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल : ‘त्या’ काळात पोलिसांच्या बदल्या झाल्याच नाहीत! रश्मी शुक्लांवर ठपका