in ,

महाराष्ट्रात आज कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण १२८२ कोरोना बाधित रुग्ण बरे

Share

भारतात सध्या कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. प्रशासन आणि सरकार आपापल्यापरीने ही परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८५९० एवढी झाली आहे. आज कोरोनामुळे २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे.

२४ तासात ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १२८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. होम क्वारंटाईनचा आकडा आज वाढलाय. राज्यात आजमितीला १ लाख ४५ हजार ६७७ जण होम क्वारंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ९ हजार ३९९ झालीय. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये.

दरम्यान, कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मुंबई मध्ये आज दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. त्यात मुंबईतील एका पोलिसाचाही समावेश आहे. तर ३९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता ५५८९ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा बळी

जळगावात एकूण २४ कोरोनाग्रस्त, ९ रुग्णांचा मृत्यू