in

Supriya Sule : ”आरक्षणावरची 50 टक्के मर्यादा शिथिल करा”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या चर्चेत भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणासंबधीच्या विविध चर्चांवर भाष्य केलं. ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर बोलताना त्यांनी 50 % आरक्षण मर्यादा हटवावी, सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण मिळावं असं म्हटलं आहे.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारनं इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज संसदेत केली. हा डेटा न मिळाल्यामुळे राज्यात  स्थानिक स्वराज संस्थेत निवडून आलेल्या 55 हजार लोकांचे आणि देशात 9 लाख ओबीसी विजयी उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. ओबीसी समाजाच्या 50 टक्के राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केंद्रसरकारने राज्य सरकारला सहकार्य करण्याची मागणीही सुळे यांनी केली आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

“पडदा उघडण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ”-अमित देशमुख;रंगकर्मींच्या पदरी निराशाच.