in ,

देशात मागील चोवीस तासात ४ हजार ९८७ नवे रुग्ण; एकुण कोरोनाग्रस्तांची ९० हजारी पार

Shocking increase in corona patients in the state
Shocking increase in corona patients in the state
Share

नवी दिल्ली: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन ३ चा आज शेवटचा दिवस आहे. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केलीय. मात्र या लॉकडाऊनसंदर्भातील माहिती अद्याप स्पष्ट नाही. चौथ्या टप्प्यातील गाईडलाईन्स जारी करण्यापूर्वी प्रत्येक राज्याने केंद्र सरकारकडे सूचना दिल्यात.

देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासात देशात ४ हजार ९८७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९० हजार ९२७ वर पोहचली आहे. त्यापैकी ३४ हजार १०९ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत एकूण २ हजार ८७२ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ३७.५१ टक्क्यांवर पोहचला आहे.

तसेच राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. मागील २४ तासात १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत काल २४ तासांत तब्बल ८८४ रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या तब्बल १८ हजार ३९६ वर पोहोचलीय. तर मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ६९६ झालीय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या जबड्यातून वाचला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

महाराष्ट्रात ३१ मे पर्यत लॉकडाऊन कायम…