in ,

चिंताजनक : राज्यात दिवसभरात 47 हजार 288 कोरोनाबाधित वाढले

राज्य सरकारने रविवारी संचारबंदी आणि काही निर्बंध आणत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या निर्बधांचा किंचितसा परिणाम आजच्या आकडेवारीत दिसून येत आहे.आज दिवसभरात 47 हजार 288 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारच्या तुलनेत पाहायला गेले तर 2 हजाराने नवीन रुग्णसंख्या घटली आहे.

आज दिवसभरात राज्यात 47 हजार 288 कोरोनाबाधित वाढले आहेत. तर आज 155 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 56 हजार 033 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच, राज्यात आज रोजी एकूण 4 लाख 51हजार 375 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.दरम्यान आज दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. तसेच, राज्यात आजपर्यंत एकूण 25 लाख 49 हजार 075 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबईत 9 हजार 857 नवीन रुग्ण

मुंबईत आज 9 हजार 857 नवीन रुग्ण आढळले,त्यामुळे एकूण बाधितांची संख्या चार लाख 62 हजार 302 झाली आहे. तर 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून 74 हजार 522 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 3 हजार 357 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख 74 हजार 985 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

ब्रेक दि चेनच्या आदेशात नवीन सुधारणा; ‘या’ सेवांचा असेल समावेश