in

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Share

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे. यामध्ये कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या संदर्भातले पत्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन ऑडिओ क्लिप सुद्धा या पत्रासोबत जोडल्या असल्याचे फडणवीस यांनी पत्रात नमूद केलं आहे.

या ऑडिओ फितींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जान कुमार सानूचं वादग्रस्त वक्तव्य; कलर्स वाहिनीचा माफीनामा

दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या