in

रायगडमध्ये 42 मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

भारत गोरेगावकर । राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याची असंख्य घटना घडल्या. या घटनेतील नागरिकांसाठी पँकेज जाहीर न करता एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदत जाहीर करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार आता रायगड जिल्ह्यातील 42 मृतांच्या वारसांना एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे प्रत्येकी 4 लाख रुपये इतक्या मदतीचे वितरण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 95 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या वारसांना मदत वाटपास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत पोलादपूरच्या 11 व तळीये येथील 31 अशा 42 मृतांच्या वारसांना एसडीआरएफच्या निकषांप्रमाणे प्रत्येकी 4 लाख रुपये इतक्या मदतीचे वितरण करण्यात आलंय. उर्वरित मृतांच्या वारसानाही मदत दिली जाणार आहे.त्यासाठी वारस निश्चितेचे काम सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रथम एसडीआरएफ अंतर्गत मदत दिली जाईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 1 लाख तर पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये इतकी मदत दिली जाणार असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली. जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. हे काम वेगाने व्हावे यासाठी जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

indo-china dispute| भारत आणि चीनमध्ये लवकरच पार पडणार चर्चेची १२ वी

दरड कोसळून मृत झालेल्यांच्या वारसांना मदतीचे वितरण सुरू, पंचनामेही सुरू