in

तानसा धरणाचे 38 दरवाजे उघडले; भिवंडी व वसईतील गावांना सतर्कतेचा इशारा

अनिल घोडविंदे, शहापूर | शहापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे तानसा धरणाचे 38 दरवाजे उघडले तर वैतरणा मोडकसागर धरणाचे 2 दरवाजे उघडल्याने नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून वैतरणा नदीवरील मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे 5 फुटाने उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून 20977 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वैतरणा नदी काठावरील वाडा व पालघर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तानसा धरणाचे संपूर्ण 38 दरवाजे उघडले असून तानसा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या भिवंडी व वसई तालुक्यातील गावांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Dombivali

MPSC Exam | राज्यसेवा मुख्य परीक्षा ४, ५ आणि ६ डिसेंबरला होणार